1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:49 IST)

तानाजी सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, मराठा समाजाची माफी मागितली

tanaji sawant
मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच या विधानामुळे सावंत यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्यामुळे अखेर तानाजी सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, मराठा समाजाची माफी मागितली आहे.
 
माफी मागताना तानाजी सावंत म्हणाले की, माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं ही माझी भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
 
शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रमुख शिलेदार आणि राज्याचे सार्वजनिकमंत्री तानाजी सावंत मराठा आरक्षणासंदर्भात भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. राज्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आरोप केले, मराठा क्रांती मोर्चे काढले, आंदोलने केली. ज्यांना ब्राह्मण म्हूणून हिणवलं गेलं. पण, त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी २०१७-१८ मध्ये भरली, असे सावंत यांनी म्हटले आहे. उस्मानाबाद येथे भाषण करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे.