शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (12:25 IST)

रायगडावर पिंडदानाचा कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ पिंडदान कार्यक्रमाचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार घडलेला सर्व प्रकार 24 सप्टेंबर चा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळ किल्ले रायगडावर  छत्रपती शिवरायांच्या समाधी स्थळाजवळ पिंडदान कार्यक्रम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेक सोहळा सुरु असता पिंडदानाचा कार्यक्रम सुरु असल्याने शिवप्रेमींचा संताप होत आहे. संभाजी ब्रिगेडचे कोकण प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने पिंडदान करणाऱ्यांना ही विधी थांबविण्यास सांगितलं आणि तिथून निघून गेले .
संभाजी ब्रिगडने या घटनेवर राज्यसरकारने लक्ष घालावी अशी मागणी केली आहे. या घटनेची पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.