शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (08:26 IST)

आरडीएक्सने भरलेला टँकर गोव्याकडे रवाना, टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

Maharashtra Police
आरडीएक्सने भरलेला एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला आहे. या टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादीही आहेत, अशी धमकी मुंबई पोलिसांना फोनवरुन मिळाली आहे. या फोननंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, गोव्याकडे निघालेल्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
 
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आरडीएक्सने भरलेला एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला आहे. या टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे त्याने सांगितले. फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव पांडे असं सांगितलं आहे.
 
या फोननंतर पोलीस अलर्ट मोडवर असून, मुंबई पोलिसांनी ही माहिती महाराष्ट्र एटीएस आणि क्राईम ब्रँचलाही दिली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor