बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:50 IST)

५०० उठाबशा काढण्याची शिक्षा विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये

एका शिक्षकाने विद्यार्थिनीला ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे त्यामुळे ती मुलगी आजारी पडली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. कोल्हापूर येथील असलेल्या चंदगडच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्याध्यापिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.भावेश्वरी संदेश विद्यालयात विजया चौगुले इयत्ता आठवीत शिकक्षण घेत आहे. ती शाळेत जेव्हा गेली तेव्हा २४ नोव्हेंबरला ती वही विसरली म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी तिला पाचशे उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयाने कश्या तरी ३०० उठ्बश्या पूर्ण केल्या आणि तिचे पाय प्रचंड सुजले होते. ती त्या दिवशी कशी तरी घरी पोहोचली मात्र तिला काही बरे वाटले नाही. तिला आगोदर खासगी रुग्णालय आणि नंतर सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.या शाळेवर आणि त्यातील मुख्यध्यापकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत असून. पालक आणि नागरिक प्रचंड संतापले आहेत.