सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा एकदा ‘पब्जी' ने घेतला बळी

मध्य प्रदेशातील नीमच गावातील १६ वर्षीय फुरकानचा ‘पब्जी या धोकादायक गेमने बळी घेतला आहे. मृत फुरकान याचे वडील हारून राशिद कुरेशी यांच्या मते त्यांचा मुलगा सहा तासांपासून पब्जी खेळत होता. मृत्यू अगोदर तो ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे ओरडला होता. यानंतर त्याल रूग्णालयातही नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर अतिदाब आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. फुरकान नसीराबादेतील केंद्रीय विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.
 
फुरकानचा मृत्यू त्याची छोटी बहिण फिजा हिच्या समोर झाला. पब्जी खेळल्यानेच आपल्या भावाचा मृत्यू झाला असल्याचे म्हणत फिजाने सांगितले की, तो मृत्यू अगोदर  अयान तु मला मारलस, मी हारलो. आता तुझ्या बरोबर नाही खेळणार  असे जोर जोरात ओरडत होता.