शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (15:21 IST)

काय सांगता,साडे सहा लाखाचं नारळ

आपल्याला एक नारळ विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 रुपये मोजावे लागू शकतात.पण एका माणसाने चक्क एक नारळाला विकत घेण्यासाठी तब्बल साडे सहा लाख रुपये मोजले आहे. कर्नाटकाच्या मंदिरातील ही घटना आहे.या मंदिरात नारळाची लिलाव करताना एका फळ विक्रेताने हे नारळ विकत घेतले.हे मंदिर आहे भगवान मलिंगरायाचे .हे महादेवाच्या वाहनाचे म्हणजे नंदीचे रूप मानले गेले आहे.या मंदिरात भाविक नारळ भेट म्हणून अर्पण करतात.नंतर देवाला अर्पण केलेल्या नारळाला आपल्या कडे ठेवल्याने भाग्यात वृद्धी होते आणि भरभराट होते.अशी आख्यायिका आहे.
 
दर वर्षी श्रावण महिन्यात शेवटी भाविकांनी अर्पण केलेल्या या नारळाचा लिलाव मंदिर समिती कडून केला जातो.हे नारळ खरेदी करण्यासाठी भाविक आणि फळ विक्रेते बोली लावतात. यंदाच्या वर्षीपण नारळाच्या लिलावासाठी 1 हजार पासून बोली लावली गेली.ती 3 लाखा पर्यंत गेली.मंदिर समितीने 3 लाख रुपयात हे नारळ देण्याचे निश्चित केले असता.एका फळ विक्रेताने दुपट्ट दाम देत साडेसहा लाखाचा हा नारळ विकत घेतला.हे देव नवसाला पावणारे आहे असे म्हटले जाते.फळ विक्रेता ने सांगितले की त्याला आर्थिक चणचण असताना आणि काही पारिवारिक त्रास असताना त्याने या देवाकडे साकडे घातले आणि त्याची भरभराट झाली.त्यामुळे त्याचा विश्वास आणि भक्ती देवावर असल्याने त्याने नारळासाठी एवढे पैसे मोजले.ते नारळ म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे आणि मी माझ्या देवघरात तो कायम ठेवणार असे त्यांनी सांगितले
मंदिर समितीने म्हटले आहे की लिलावाचे हे पैसे मंदिराच्या विकासासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येतील.