सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (20:45 IST)

मंदिर कधी उघडणार? दसर्‍यानंतर निर्णय...

राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आला असला तरी अजूनही मंदिरं आणि सिनेमागृह उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. मंदिरं उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
राज्यातील मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यापारी, छोटे उद्योजक, फुल व्यावसायिक, पुजारी इत्यादींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून मंदिरे उघडावीत अशी मागणी राज्य सरकारकडे होत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार यावर कोणताही निर्णय घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
 
आता राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या शंखनाद नंतर मनसेने घंटानाद आंदोलन केले आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
 
मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता दसरा आणि दिवाळीचं सण देखील तोंडावर आला आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.