बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (12:12 IST)

दहावीचे गुणपत्रक आजपासून मिळणार

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या 10 वी चे गुणपत्रक आज 9 ऑगस्ट पासून मिळणार आहे.अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिवांनी दिली.या संदर्भात पत्र काढल्याचे त्यांनी सांगितले. मान्यता प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रक नियोजित केंद्रावर जाऊन घेऊन यावे लागणार.ग्रामीण भागात ही प्रमाणपत्र आणि गुणपत्रक विभागीय मंडळ कार्यालयातून सकाळी 11 ते 1 आणि 1 ते 3 या वेळेत मिळतील. तर शहरी भागासाठी हे गुणपत्रक शिशु  विकास मंदिर शाळेत सकाळी 11 ते 3  वाजे पर्यंत मिळणार. 
 
विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून केंद्रावर जाऊन गुणपत्रक घेऊन जावे असे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आवाहन केले आहे.