बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (10:13 IST)

बोईसर MIDC मध्ये भीषण स्फोट

Terrible explosion in Boisar MIDC Maharashtra News Regional Marathi  News In Marathi
आज सकाळी बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसी बोईसर मध्ये नंडोलिया ऑर्गनिक प्रायव्हेट कंपनीत भीषण स्फोट झाला.तारापूर एमआयडीसी मध्ये आज सकाळी कापडाच्या उत्पादक कंपनीत मोठा स्फोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.या अग्निकांडात 4 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बोईसरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतीला पोहोचले आहे.आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.या कंपनीत डाय क्लोरो बेंजमाईड एजॉल हे प्रोडक्ट चे काम सुरु असताना त्यात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे प्रेशर वाढून स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.ही माहिती कंपनीच्या एका ऑपरेटरने दिली.
 
या भीषण स्फोटात 4 जण गंभीर झाले आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.