रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (08:27 IST)

चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक, लवकरच निर्णय घेणार

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करतं आहे.
 
नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांसाठी मौसम असतो. त्यामुळे चित्रपटगृहं सुरु करण्याची संमती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.” “महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे शिथीलता देण्याआधी विचार केला जाईल मगच निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि या समस्येतून मार्ग काढू. लवकरच यासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल” असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.