संबंधित माहिती
- हरितालिका तृतीया विशेष : सौभाग्याचा संरक्षणासाठी करावं हरितालिका तृतीया व्रत कैवल्य..
- यापुढे कधीही अशी चूक करणार नाही असं म्हणत सैफने अमृता सिंगची कॅमे-यासमोर मागित होती माफी
- पारिजातकाचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या...
- अमृता फडणवीस त्या तीन शब्दांमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
- राजगृह : हल्ला झाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर आतून कसं आहे?
तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना
Photo : Instagram
प्रिया आहूजा राजदा (Priya Ahuja Rajda) ने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यासह एक लांबलचक पोस्ट देखील लिहीली आहे. या नोटमध्ये तिने लिहिले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि याबाबत मी तुम्हाला सूचित करणे माझे कर्तव्य आहे. माझ्यात व्हायरसचे कोणतेही लक्षण नाही आहे. जे कुणी गेल्या 2-3 दिवसात माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. मी आतापर्यंत घरीच होते आणि शूटिंग देखील करत नव्हते तरी देखील मला कोरोना झाला. स्वत:ला सुरक्षित ठेवा आणि मास्क घालण्यास विसरू नका.
मुंबई महापालिकेने दिलेल्या सर्व सूचना आपण फॉलो करत असल्याचेही यावेळी प्रियाने म्हटले आहे. प्रिया आहूजाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. या मालिकेतील तिचे सहकलाकार जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी म्हटले आहे की, 'तू लवकर बरी व्हावीस यासाठी प्रार्थना करेन. काळजी घे. तू लवकरच ठीक होशील.'
