गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (12:22 IST)

स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करून अंधश्रद्धा दूर करण्याचा संदेश

Photo : Symbolic
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील एका रहिवाशाने समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धेविरुद्ध संदेश देण्यासाठी स्मशानभूमीत आपला वाढदिवस साजरा केला. गौतम रत्न मोरे 19 नोव्हेंबर रोजी 54 वर्षांचे झाले आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी शनिवारी रात्री महाणे स्मशानभूमीत एक सेलिब्रेशन आयोजित केले जेथे पाहुण्यांना बिर्याणी आणि केक देण्यात आला.
 
बुधवारी सोशल मीडियावर या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये लोक वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. काळी जादू आणि अंधश्रद्धा विरोधात प्रचार करणाऱ्या प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सिंधुताई सपकाळ आणि दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून आपल्याला याची प्रेरणा मिळाल्याचे मोरे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
 
भूत म्हणजे काहीही नसतो, हा संदेश लोकांना द्यायचा आहे, असेही ते म्हणाले. मोरे म्हणाले की, त्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला 40 महिला आणि लहान मुलांसह 100 हून अधिक पाहुणे उपस्थित होते.

Edited by: Rupali Barve