शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (08:52 IST)

राज्यातील या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू झाला ७वा वेतन आयोग

सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक आणि ६ हजार १५९ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ११ हजार ८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
 
मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित  केला आहे.
 
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.
 
त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय व वित्त विभागाने समन्वय साधून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने  २३ एप्रिल रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.