सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (14:33 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्याकडून घेतले जीवनाचे धडे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात महत्त्वाचे 4 लोक गुरुस्थानी आहेत.
1 राजमाता जिजाऊ - शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. मातोश्री कडून त्यांनी महाभारत आणि रामायण ऐकून आणि कंठस्थ करून धर्माचे धडे शिकले. त्या वरूनच  अधर्मावर धर्माची विजय मिळविणे शिकले. कारण त्यावेळी मुघलांनी मातोश्री जिजाऊंच्या जाधव घराण्याचे नायनाट केले होते. मुघलांना धडा शिकविण्यासाठी जिजाऊ मातेने शिवबांना बालपणापासूनच धर्माचे बाळकडू पाजले. तसेच संस्काराची शिदोरी देखील त्यांना जिजाऊ मातेकडून मिळाली. तलवारबाजी घोडेस्वारी शिकवले. तसेच राजमाता जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील दिले.
 
2 आबासाहेब छत्रपती शहाजीराजे- शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे हे त्यांचे दुसरे गुरु होते. छत्रपती शहाजी राजे यांनी दोन वेळा स्वराज्य स्थापित करण्याचे प्रयत्न केले पण ते अपयशी झाले. आपण जी चूक केली आहे ती चूक शिवबांनी करू नये. या साठी त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा झेंडा आणि राज मुद्रा देऊन त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन केले.
 
3 दादोजी कोंडदेव - हे शिवरायांचे तिसरे गुरु होते.दादोजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धकौशल्याचे आणि नीतिशास्त्राचे धडे देऊन त्यामध्ये पारंगत केले. तसेच पुण्याच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन दिले. 
 
4 याशिवाय त्यांनी अध्यात्मिकतेचे शिक्षण सद्गुरू समर्थ रामदास स्वामींकडून घेतले. स्वराज्य रक्षणासाठी देखील रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे.