शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (07:22 IST)

विचाराची लढाई विचाराने लढावी, जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका-अजित पवार

ajit pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. राज्यातील जातीय सलोखा टिकून राहावा.आणि सोबतच नेत्यांना येणारे धमकीचे प्रकार थांबबावे यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलयं.जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका असेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठणकावून सांगितले.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, विचारांची लढाई विचारांनी करावी. जाणीपर्वूक काहींना बदनाम करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केला जातोय. पक्षाविषयी तसेच नेत्याविषयी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजी नगरला औरंगाबादच म्हणणार अस शरद पवार म्हणाले अशी चूकीची बातमी दाखवण्यात आली.इतके वर्ष पवार साहेब काम करत आहेत ते असं का बोलतील? समाजात संभ्रवस्था निर्माण करणाऱ्या बातम्या का दिल्या जातात? बातमी खरी की खोटी याचा तपास करावी आणि मगच बातमी द्यावी. यामुळे नाहक बदनामी होतेय असेही पवार म्हणाले.
 
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. याची चौकशी आम्ही केली. सौरभ पिंपळकर याने हे ट्विट केलयं. त्याच्या बायोमध्ये तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलयं. तो खरचं भाजपचा कार्यकर्ता आहे का हे आम्हाला माहित नाही. त्यांच्या पक्षाने अस करायला लावलं का? असे अनेक सवाल अजित पवार यांनी केले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की , विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य आहे. संविधानाने तो अधिकार आपल्याला दिला आहे. त्या अधिकाराचा गैरवापर होत असल्याचा आरोप पवारांनी केला. सौरभ पिंपळराचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध सरकारने घ्यावा अशी मागणी केली. त्याचबरोबर त्याचा शोध घेवून त्याच्यावर पोलीसांनी कारवाई करावी असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor