गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (17:36 IST)

ठाण्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह चाळीतून सापडला

death
ठाणे येथील एका चाळीतून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनाच्या अहवालात मुलीच्या मानेवर जखमा असून चाकूने वार करत तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी एकटीच राहत असून तिचा गळा आवळून खून केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात एका 17 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला असून मुलीचा मृतदेह कोलशेत परिसरातील तारीचा पाडा येथे  एका चाळीतील खोलीतून सापडला.
 
शव विच्छेदनाच्या अहवालात मुलीच्या मानेवर जखमांच्या खुणा आणि चाकूच्या जखमा असल्याचे समोर आले आहे. 
 
 पोलिसांनी मुलीचा खुनाच्या प्रकरणात अज्ञात लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 302 हत्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.कापूरबावडी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.   
 
Edited by - Priya Dixit