1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (15:12 IST)

देशी कट्ट्यातून चुकून गोळी सुटली आणि ती गोळी थेट समोर उभ्या असलेल्या वहिणीला लागली

The bullet accidentally escaped from Deshi Katta and hit the sister-in-law who was standing directly in front of her
अहमदनगर कोपरागावमध्ये एका तरुणाला देशी कट्टा घेऊन बहिणीसमोर शायनिंग करणे चांगलंच महागात पडलं आहे. त्याने आणलेल्या देशी कट्ट्यातून चुकून गोळी सुटली आणि ती गोळी थेट समोर उभ्या असलेल्या वहिणीला लागली हा देशी कट्टा दाखवणे चांगलंच वाहिनीच्या जीवाशी आले आणि यात समोर उभ्या असलेल्या वाहिनीचा जीव गेला. यात मृत्यू झालेल्या महिलेचे सुनीता भालेराव असं नाव आहे.
 
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव इथे दुपारी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे.विशाल भालेराव नावाच्या तरुणाने विनापरवाना गावठी कट्टा आणला होता. त्यानंतर घरात वहिनीला गावठी कट्टा दाखवताना हा प्रकार घडला आहे. वहिणीला देशा कट्टा दाखवत असताना शायनिंग मारत केलेली मस्करी हि वाहिनीच्या जीवावर बेतली आणि हि मस्करी त्याला चांगलीच महागात पडली. या वेळी आणलेला कट्टा दाखवताना विशालकडून कट्टयाचा खटका ओडला गेला.आणि कट्ट्यातून गोळी सुटली
 
कट्ट्यातून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या सुनीता भालेराव या त्याच्या वहिनीच्या डोक्यातून थेट आरपार गेली. आणि सुनीता जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली . हातून घडलेली घटना आणि डोळ्या समोरील दृश्य पाहून विशाल घाबरून जागेवरून फरार झाला. यांनतर हि बाब शेजारील लोकांच्या लक्ष्यात आल्यानंतर लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुनीताला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
 
या घटने बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधासाठी पथकं रावाना केली. पोलिसांनी एका तासात संशयित आरोपी विशालला अटक केली आहे .