1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:42 IST)

मोबाईल घेऊन दिला नाही, मुलाची स्वत:च्याच शेतात आत्महत्या

child suicides
यवतमाळच्या केळापूर गावामध्ये एका १४ वर्षीय मुलाने वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून स्वत:च्याच शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृत मुलगा नववी इयत्तेत शिकत होता. सौरभ भोयर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सौरभने त्याच्या वडिलांकडे अँड्रॉईड फोनची मागणी केली होती. आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या वडिलांनी सुरुवातीला फोन घेऊन देण्यास नकार दिला. सौरभने सध्या अभ्यासवर लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र, सौरभने अँड्रॉईड फोनचा हट्ट काही केल्या सोडला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी कापूस विकून त्या पैशातून लवकरच तुला मोबाईल घेऊन देईन, असं सौरभला कबुल केलं. मात्र,  शाळेत जात असताना सौरभ त्याच्या मोठ्या भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात गेला होता. मात्र, भावाला डबा दिल्यानंतर तो तिथून अचानक गायब झाला. त्यानंतर सदरचा प्रकार उघड झाला.