गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जामनेर , बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (12:56 IST)

लग्नाआधी वधु पित्याचा मृत्यू!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.  पित्यासाठी आपल्या मुलीचे लग्न हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि प्रत्येक पितासुद्धा आपल्या आपल्या मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे लावण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो या क्षणाची वाट पाहत असतो. मात्र, काहीवेळा काळ अचानक घाला घालतो आणि होत्याचं नव्हतं होतं.  हृदयविकाराने मृत्यू या वधुपित्याचा मृत्यू झाला असून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ केली जात आहे. अरुण कासम तडवी, असे वधू पित्याचे नाव आहे.