मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:01 IST)

सरकार पडेल असं वाटल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत - अण्णा हजारे

"38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर आणखी दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. सरकार पडेल, असा दबाव आल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत," असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं तरी भाजपने आक्रमकपणे संपात सहभागी होणं सुरू केलं आहे.
 
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी आपला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.तसंच अण्णा हजारे यांनी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी केल्या. सरकारवरील दबाव आणखी वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं.