1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (22:19 IST)

जाब विचारत बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती : पाटील

त्रिपुरात मशीद पाडल्याच्या कथित वृत्तानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटणे यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल, असा जाब विचारत स्व. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर बोलत होते.
 
सरकार वाचवण्यासाठी तसेच निवडणुकीमध्ये एका समाजाची मते मिळाली, यासाठी काळजी घेतली जात आहे. परंतु हे चुकीचे आहे. आपले हिंदुत्व सोडले का, असा प्रश्न उपस्थित करून  नागरिकांना समजते, की कोण काय करतो, असा टोलादेखील शिवसेनेला लगावला आहे.
 
सध्या ड्रग्जला समर्थन दिले जात आहे. मात्र, तुम्हाला झोपताना, उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला. आरोग्य पेपर आम्हीच फोडला. शेतकरी पैसे आम्ही थांबवले. अरे काय चेष्टा चाललीय. गृहमंत्री जेलमध्ये आहेत. काही सुपात आहेत, तर काही जात्यात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केली. सगळीकडे भाजपाचा हात आहे, असे म्हणता, मग तुम्ही तीन पक्ष समर्थ आहात ना? भाजपाचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवले, असे आव्हान त्यांनी दिले. अमरावतीत खुलेआम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील, अशी टीका त्यांनी केली. 
 
पाटील म्हणाले की, काम राहिली असतील, तर नगरसेवकांच्या मागे लागून करून घ्या. पण विकासकामे सुरू ठेवायचे असतील, तर पुन्हा सत्ता द्या. मोदीजींना मुख्यमंत्री म्हणून देखील 15 वर्षांचा वेळ मिळाला. त्यामुळे गुजरातचा विकास झाला. आता पाहा देशात तिसऱ्या टर्मला भाजप 418 खासदार निवडूण आणणार. महाराष्ट्रात जसं मधेच सरकार गेलं आणि आपण पश्चाताप करतो, तसं होऊ देऊ नका. देवेंद्रजीचे काम बघून लोकांनी मतदान केलं, पण गद्दारी झाली, असा आरोप त्यांनी केला.