मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (21:19 IST)

ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, राउत यांची माहिती

हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे सिनेमा २०१९मध्ये प्रेक्षकांच्या भेटील आला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट येणार असल्याची माहिती शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ही माहिती दिली.
 
ठाकरे सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा करताना राऊत यांनी म्हणाले, जेव्हा मला काही काम नसते तेव्हा मला सिनेमा पहायला आवडतो. मला नेहमी असे वाटत की ज्या विषयावर कोणीही सिनेमा तयार करते त्यावर आपण लिहावे, म्हणूनच मी ठाकरे हा सिनेमा तयार केला. बाळासाहेबांवर सिनेमा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आम्ही तो बनवला. आता ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट देखील बनवत आहोत असे राऊत म्हणाले.