बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 जून 2022 (13:07 IST)

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे गटाने दिले 51 लाख रुपये

सध्या आसाममध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 100 हून लोकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. 5 हजारहून अधिक गावांमध्ये47,72,140 लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील विविध भागात 2 लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये आहेत.महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारला आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेचे काही आमदार आसामच्या गुवाहाटी येथे आहे. आसाम मध्ये सध्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. अनेक लोक बेघर झाले आहे. अन्न  वस्त्र निवारा हे संकट तिथे उद्भवत आहे. अशा परिस्थितीत मंत्री एकनाथ शिंदे गटाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रुपये 51 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला असून अशी घोषणा करत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. 
'आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे