मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:50 IST)

फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, डॉ. तात्याराव लहाने यांचा आरोप

फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असा खळबळजनक आरोप प्रसिद्ध नेत्रतज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला आणि काम करायला संधी मिळाली, अशी कबुलीही त्यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
 
डॉ. लहाने म्हणाले, “मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली.” मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठींबा आहे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.