गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:27 IST)

शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून संपविली जीवनयात्रा

The farmer ended his life by consuming poisonous drugs शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून संपविली जीवनयात्राMarathi Regional News In Webdunia Marathi
अहमदनगर तालुक्यातील ससेवाडी येथील शेतकरी कर्जाला कंटाळून दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ससेवाडी येथील शेतकरी दिलीप मगर यांना ७ एकर जमीन असून त्यांच्याकडे सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे अस्मानी व तुलतानी संकटात सापडल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. कांदा लागवडीसाठी उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने मगर यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.