मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (23:36 IST)

बाप्परे, 30 वर्षांपासून बंद असलेलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत सापडली मानवी कवटी आणि हाडे

मालेगावमध्ये चक्क 30 वर्षांपासून बंद असलेलेल्या वाडिया हॉस्पिटलच्या खोलीमध्ये मानवी कवटी आणि हाडे सापडली आहेत. या प्रकारामुळे लोकांमध्ये घबराहट पसरली असून,  याबाबत चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 
 
मालेगावमध्ये महापालिकेचे प्रसिद्ध असे वाडिया हॉस्पिटल आहे. सध्या वाडियासह अली अकबर रुग्णालयाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही हॉस्पिटलच्या इमारतींचे काम सुरू आहे. अनेक खोल्या तोडल्या जात आहेत. नवे साहित्य विकत आणले जात आहे. खोल्या मोठ्या केल्या जात आहेत. या रुग्णालयाच्या आवारात गेल्या तीस वर्षांपासून बंद असलेली एक खोली आहे. हे सारे काम सुरू असल्याने ही खोलीही उघडण्यात आली. तेव्हा कर्मचाऱ्यांना धक्का बसला. त्यांना खोलीमध्ये चक्क मानवी कवटी आणि हाडे सापडली. याबाबतची  माहितीवाडियाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत गढरींना दिली. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पाठवला आहे. दरम्यान, या कवटीचा जबडा तुटलेला आहे. हाडाचे दोन्ही भाग तुटलेले आहेत. 
 
वाडिया हॉस्पिटमध्ये पूर्वी एक शवविच्छेदन गृह होते. मात्र, मालेगावमध्ये सामान्य रुग्णालय सुरू झाले आणि येथील शवचिकित्सा बंद झाली. या शवविच्छेदन गृहाशेजारच्या खोलीमध्येच ही कवटी आणि हाडे सापडलेली आहेत.