शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (16:34 IST)

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्याचे, शेतकरीने प्राण वाचवले

सध्या परतीचा पाऊस सुरु झाला आहे.रात्री पासून पावसाने हिंगोली शहर आणि संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे.मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरण देखील पूर्ण क्षमते भरले आहे त्यामुळे नदी पात्राची पातळी वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरातील कयांधु नदीला पूर आला आहे.या पुरात सोयाबीनची गंजी वाहत जात होती  हे बघून मासेमारी साठी पाण्यात उतरलेले रामण पावडे यांचा तराफा या गंजीत अडकला आणि स्वताःचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी गंजीचा आधार घेतला. पाण्याच्या प्रवाह वेगाने असल्यामुळे पावडे हे त्या गंजीत अडकलेल्या थर्माकोलच्या तराफासह डोंगरगावापासून शेवाळे गावा पर्यंत सुमारे 5 किलोमीटर नदीच्या पात्रात वाहत गेले.त्यांना पुराच्या पाण्यात वाहताना बघून शेवाळे गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांना वाचवले.