1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मार्च 2025 (12:54 IST)

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आजपासुन सुनावणी

Sarpanch Santosh Deshmukh murder case : महाराष्ट्रात काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आज म्हणजेच १२ मार्च रोजी पहिली सुनावणी होणार आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिकी कराड हा गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.  
तसेच या प्रकारसोबतच चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांनी देखील अखेरीस राजीनामा दिला. देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड असल्याचे स्पष्ट झाले असून आता पहिली सुनावणी आज आहे. आरोपपत्र दाखल झाल्यावर सरपंच देशमुख हत्याकांड बद्दल पहिली सुनावणी बुधवार १२ मार्च रोजी केज जिल्हा सत्र न्यायालयात होत आहे. तसेच हत्येच्या मुख्य आरोपीचे जबाब न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आलेले मुख्य आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचे जबाब नोंदवण्यात आले असून १६४ साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहे. ही सुनावणी खूप महत्त्वाची असणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली होती. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच या  प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.मिळालेल्या महतीनुसार बुधवारी आरोपींचे जबाब न्यायालयात सादर केले जाणार आहे.
Edited By- Dhanashri Naik