गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:35 IST)

पुजाच्या वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पूजाच्या वडिलांनी असेल म्हटले आहे की, पूजा इमारतीवरुन उडी मारल्याने डोक्यावर पडली. तिला डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पूजाच्या जाण्याने प्रचंड धक्का बसला आहे. वडिलांनी सांगितल्यानुसार पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतले होते. पंरुतु कोरोना आणि नंतर बर्ड फ्लूमूळे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जाच्या हफ्त्याचे पूजाला प्रचंड टेंशन होते. ती निराश झाली होती. गावी नैराश्य वाढत असल्यामुळे पूजाने पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि ती पुण्याला गेली. तिकडेच तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे पूजाच्या वडिलांनी म्हटले आहे.
 
पूजाच्या आत्महत्येचे राजकारण केले जात आहे. तिला पूजाच्या नावानं सुरु असलेल्या चर्चेमुळे बदनामी होत आहे. हीच बदनामी थांबवायला पाहिजे यामुळे घरच्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा पूजाचा नसल्याचेही वडिल लहूदास चव्हाण यांनी सांगितले आहे. आमचा कोणावर संशय नाही. पोलिसा त्याचा तपास करत आहेत. मी कोणावरही संशय नसल्याचा जबाब नोंदवला आहे. असे पूजा चव्हाणचे वडिल लहूदास चव्हाण यांनी म्हटले आहे.