राज्य सरकार कडून रतन टाटा यांना पहिलाच'उद्योगरत्न पुरस्कार जाहीर
राज्य शासनाकडून आता दरवर्षी 'महाराष्ट्र भूषण म्हणून उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. या पुरस्कारासाठी राज्यातील पहिले मानकरी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची निवड करण्यात आली असून त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे,
उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हा उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक समितीची बैठक बोलावली होती. तसेच राज्यात उद्योगांच्या उभारणी आणि गुंतवणुकीसाठी परवानगी लागते. या लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानगी एकाच ठिकाणी मिळावी या साठीची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, व्यापार गुंतवणूक सुविधा मिळावी म्हणून विधानपरिषदेत विधायक मांडले गेले.
हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर अपेक्षित आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. राज्य सरकार कडून उद्योगरत्न पुरस्कार सह युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक असे तीन पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. अद्याप पुरस्काराचे स्वरूप आणि पुरस्कार कधी देण्यात येईल हे समजू शकले नाही.
Edited by - Priya Dixit