शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (15:56 IST)

राज्यात येत्या काही दिवस थंडीचा जोर वाढणार

यंदा सर्वत्र थंडीचा जोर आहे. उत्तरभारतात थंडीने नागरिक हैराण झाले आहे. यंदा सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा संक्रांती नंतर राज्यात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. येत्या 10 दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा, नाशिक, नागपूर पुणे, मुंबई या ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली जाऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच मालेगाव, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी देखील तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
Edited By - Priya Dixit