1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (10:41 IST)

राज ठाकरेंना अयोध्याबंदी करणारे बृजभूषण सिंहांचे पुण्यात स्वागत

BJP MP from Uttar Pradesh Brijbhushan Singh came to Pune
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यात आले होते. महाराष्ट्रात येताच बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे मंचावर भेट घेण्यासाठी आले तर नक्कीच भेटू असं ते म्हणाले. माझं आणि त्यांचं वैयक्तिक वैर नाही असंही त्यांनी सांगितलं.
 
मनसेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदवरच्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आयोध्येत राम मंदिराला जाण्याचं ठरवलं होतं. याकरिता कार्यकर्ते मोठे उत्साहीत झाले होते. मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्याच वेळेस राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यामुळे राज ठाकरे यांना आयोध्या दौरा स्थगित करावा लागला होता. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
 
बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध विसरून राज ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी कोणताही विरोध किंवा भूमिका दर्शवली नाही.
 
"कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहित नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, ते दिवस गेले", असं बृजभूषण सिंह म्हणले.
 
Published By- Priya Dixit