1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (09:25 IST)

किल्ले पन्हाळगडावरील तटबंदी पुन्हा ढासळली

The embankment along the Rajdindi routes collapsed early 21 Maharashtra Regional News
किल्ले पन्हाळगडावरील तटबंदी पुन्हा ढासळली आहे. राजदिंडी मार्गांवरील तटबंदी आज (ता. २१) पहाटे ढासळली. यामुळे शेजारील बुरुजाला ही त्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी ढासळण्याची शक्यता आहे. यामुळे गडाखालील वाड्या वस्तीतील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 
दर पावसाळ्यात किल्ले पन्हाळगडावरील एक बुरुज ढासळतो. तर ठिकठिकाणी तटबंदी ढासळाला लागली आहे. याकडे पुरातत्व विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी केला आहे. पुरातत्व विभागाला जागे करण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्यातील गडप्रेमी ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. राज्यातून पुणे, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, मुंबईतून हे गडप्रेमी किल्ले पन्हाळगडावर आले होते.