शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (09:17 IST)

श्रीरामाच्या नावावर देशांमध्ये आतंकवाद पसरवला जात आहे-तुषार गांधी

तुषार गांधी यांनी आज केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. श्रीरामाच्या नावावर देशांमध्ये आतंकवाद पसरवला जात आहे. श्रीरामाचे नाव घेऊन लोकांची हत्या केली जात आहे. हिंदूंराज्य आले पाहिजे अशी केंद्र सरकारची रणनीती आहे. याच्या सर्व हालचाली दिल्ली आणि नागपुर वरून चालतात. अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
देशामध्ये अस्वस्थता पसरली आहे. 1942 साली सामान्यांच्या मुक्तीसाठी जसा लढा उभारला होता तसाचं लढा पुन्हा उभारून जनक्रांती आणण्याची गरज असल्याचे गांधी यांनी नमूद केलं. देशांत एकच सरकार असल्यामुळे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. देश सध्या हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे. याला कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन ही चळवळ उभी केली पाहिजे. हर घर तिरंगा माझ्या मनात आहे. मी देशवासियांचे कौतुक करतो. पण देशाचे प्रेम करत असताना ‘ध्वजा’ ची अवस्था सध्या कशी आहे? हे सरकारने सिद्ध केले नाही. राष्ट्रप्रेम हें स्वतःच्या हृदयात असणे हें अधिक गरजेचे असल्याचे गांधी यांनी सांगितले.