बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 5 डिसेंबर 2022 (08:48 IST)

खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून नातवानेच केला आजी आजोबांचा खून

murder
नाशिक : खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून नात्वानेच आजी आणि आजोबांचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे…
 
वेरुळे (ता. कळवण) येथील उंबरदरी शिवारातील नारायण मोहन कोल्हे (वय ९४) व सकुबाई नारायण कोल्हे (वय ८८)यांनी खर्चाला पैसे दिले नाहीत, म्हणून रागाच्या भरात नातू काळू ऊर्फ राजकुमार हरी कोल्हे (रा. वरखेडा ता. कळवण) याने दोघांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जीवे ठार मारले.
 
शुक्रवार (ता. ३) रोजी मध्यरात्री संशयिताने दोनच्या सुमारास पैसे देण्यावरून भेदभाव करतात, याचा राग धरून वेरुळे येथील आजोबांच्या राहत्या घराच्या पडवीत असलेल्या कुऱ्हाडीने झोपेतच दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारले.
 
अभोणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेरूळे यथील उंबरदरी शेतवस्तीत राहणार्‍या वृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी तसेच गावात डोंगर्‍यादेवाचा कार्यक्रम असल्याने मुलगा अमरचंद नारायण कोल्हे हे सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरी गेले असता घराच्या बाजूला आईचा मृतदेह  व घरात वडीलांचा मृतदेह रक्ताच्या थोराळ्यात दिसून आला. त्यानंतर मुलगा अमरचंद यांनी अभोणा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळविली.
 
मयत नारायण, सकुबाई यांचा मुलगा अमरचंद कोल्हे (अभोणा ता. कळवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक निरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी राजकुमार हरी कोल्हे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. श्री. शिंदे व उपनिरीक्षक एकनाथ भोईर पुढील तपास करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor