शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (18:37 IST)

जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला,गोंदियातील घटना

गोंदिया :गोंदिया तालुक्यातील बिरसी मध्ये भारत बटालियनच्या कॅम्प मध्ये एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे प्रयत्न करण्याचे वृत्त समोर आले आहे.ही घटना आज सकाळी घडली.आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या जवानाचे नाव डी.जी.मोरे असे आहे.  
 
सकाळी पहाटे मोरे यांची ड्युटी लावली होती.त्यांनी ड्युटी करत असताना स्वतःच्या हाताने बंदुकीने हनुवटीवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.त्याला रक्तबंबाळ झालेले बघून त्यांना उपचारासाठी तातडीने  हॉस्पिटल मध्ये  दाखल केले. त्यांच्या वर उपचार सुरु आहे.आयआरबीचे पोलीस निरीक्षण सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.मोरे यांनी असे का केले अद्याप माहिती मिळाली नाही.