रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (09:28 IST)

साताऱ्यात २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलवणार

kamal 600
सातारा :देशात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला. त्या १४४ ठिकाणी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलंय. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदार सांगत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाय. त्यामुळे केंद्रीय वाणीज्य राज्यमंत्री सोम प्रकाशजी दि. २८, २९, ३० ऑगस्ट रोजी सातारा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी भाजपाच्यावतीने करण्यात आलीय, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत दिलीय.
 
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे हे बोलत होते. यावेळी विक्रम पावसकर, माजी आमदार मदन भोसले, अतुल भोसले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे हे म्हणाले, भाजपाचा जेथे जेथे २०१९ च्या निवडणूकीत पराभव झाला. त्या मतदार संघात विजय खेचून आणण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला आहे. असे १४४ मतदार संघ देशात आहेत. त्यामध्ये राज्यात 16 मतदार संघ आहेत. तेथे भाजपाच खासदार कसा निवडून येवू शकतो.