सोशल मीडियावर वृत्तपत्रांसंदर्भात फिरणारा 'तो' संदेश खोटा, गुन्हा दाखल

whatsapp message
Last Modified मंगळवार, 24 मार्च 2020 (09:49 IST)
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने वृत्तपत्रांबाबत व्हॉटसॲपवरून खोटा संदेश पसरविणा-याविरुध्द जिल्हा माहिती अधिकारी यांच्या तक्रारीवरून यवतमाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जिल्हाधिकारी यांच्या सुचना’ या अंतर्गत खोटा मॅसेज निदर्शनास आला. शिवाय या मॅसेजच्या खाली जिल्हा माहिती कार्यालय असे लिहिलेले आढळले. ही बाब जिल्हा माहिती अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून यात वृत्तपत्रासंदर्भात खोटी माहिती असल्याचे प्रशासनाला सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करून पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. त्यानुसार या संदर्भात शहर पोलिस स्टेशमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
fake message
वृत्तपत्रे स्वयंचलित मशीनवर तयार केली जातात. कोणत्याही मॅन्युअल टचशिवाय तसेच ग्लोव्हज आणि फेसमास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांच्या छापील गठ्ठे वाहून नेले जातात.
वाचकांच्या घरी पाठवण्यापूर्वी वृत्तपत्र डेपोमध्ये हायजीन प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरांमध्ये वस्तूंच्या वितरणामध्ये दूषित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.
अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरी वितरित केलेल्या वृत्तपत्रांचा संसर्ग होण्याचा धोका नाही. कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच आजारपणासंबंधीची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्र हे विश्वासार्ह स्त्रोत आहे. त्यामुळे अफवा पसरविणा-या लोकांविरुध्द प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. डी.सिंह यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

पंतप्रधानांचे लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत

पंतप्रधानांचे लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत ...

ही एकजूट होण्याची संधी : राहुल गांधी

ही एकजूट होण्याची संधी : राहुल गांधी
देशात कोरोना व्हायरसच रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने माहितीत ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...