1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (11:21 IST)

राज्यात यंदा मान्सून 10 दिवस लवकर दाखल होणार

monsoon
गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहे.  युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेने यंदा मान्सून 10 दिवस लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात होणाऱ्या वातावरणाच्या बदल मुळे यंदा भारतात मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. 
यंदा 20 मे ते 21 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सून केरळात 28 ते 30 मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तळकोकणात मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्यानंतर 7 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच यंदा मुंबईत 11 जून पर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो.