सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (08:44 IST)

12 दिवसांनंतर राणा दांपत्य जामिनावर बाहेर आले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांची 12 दिवसांपूर्वी तुरुंगात रवानगी झाली होती. अखेर दोघेही जामिनावर बाहेर आले आहेत.
 
तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रक्तदाब, मणक्याचा त्रास होत असल्यानं नवनीत राणांनी रुग्णालय गाठलं.

नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती रवी राणा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या.
 
रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.