भाऊ मुख्यमंत्री झाल्यानं पोटदुखी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
"गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे," असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, "आज लोक पेटवा-पेटवीची भाषा करतायेत, आमचं संपूर्ण आयुष्य गेलं, सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी. पण माचिस देऊन पण उपयोग नाही, ती पेटायला काही तयार नाही. सर्व दारुगोळा शिवसेनेकडे आहे."
"शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती करता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला," असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंच्या भोंगेबंदीच्या मागणीवर निशाणा साधला.
सेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात, असा आरोप नाव न घेता संजय राऊतांनी केला.