सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (08:48 IST)

मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार - दानवे

"ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत," असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. परशुराम जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
"जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे," असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.