शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:35 IST)

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच! मित्रांमध्ये झालेल्या वादातून युवकाचा खून…

murder
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा युवकाचा खून झाल्याची घटना घडलीय. शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्बन नाका या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेने शहरात नक्की चाललय काय? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय.विश्वनाथ सोनवणे असे या मयत युवकाचे नाव आहे. आणि मित्राच्या झालेल्या वादातून त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केलाय. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी रफिक शेख या तरुणाला त्याच्या एका मित्राने शिवीगाळ केली होती. या शिवीगाळ करणाऱ्या मित्राची मयत विश्वनाथ सोनवणे या मित्राने बाजू घेतली होती. याचा रफिक याला राग आला होता. काल रात्रीच्या सुमारास समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे आणि आणखी दोन तीन मित्र दारू पिऊन गप्पा मारत उभे होते. त्यातच रफिक याने मागचा राग काढत इतर मित्रांसह विश्वनाथ याला मारहाण केली. रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकू भोकसल्याने तो गंभीर जखमी झाला.

त्याचवेळी संशयितांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र अति रक्तस्राव झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस हवालदारांच्या सतर्कतेने संशयित आरोपी मित्रांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. गंगापूर पोलिसांनी या संशयितांना चौकशी केली असता, दोघांनी रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली.
 
दरम्यान, नाशिक शहरात सातत्याने किरकोळ कारणातून खुनाच्या घटना घडत आहे. गेल्या चार दिवसांत ही खुनाची दुसरी घटना घडल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे..
 
Edited By - Ratnadeep Ranshoor