रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 10 जून 2024 (21:46 IST)

मंत्रिपदावरून एनडीएत खदखद, शिंदे गटाचे बारणे म्हणतात-'शिवसेनेबरोबर दुजाभाव'एक राज्यमंत्रीपद मिळायला पाहिजे

shrirang barne
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर एनडीएच्या घटकपक्षातील नाराजी समोर यायला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिंदे गटातील श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

मंत्रिपद वाटपात शिवसेनेला फक्त राज्यमंत्रिपद देऊन दुजाभाव करण्यात आला, असं म्हणत बारणे यांनी नाराजी थेटपणे बोलून दाखवली."शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं", असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.
 
एनडीए मधील एक-एक खासदार निवडून आलेल्या इतर घटक पक्षांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवालही बारणे यांनी उपस्थित केला.
कुटुंबाचा विरोध पत्करून महायुतीत आलेल्या अजित पवारांनादेखिल एक मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्राच्या सहा मंत्र्यांचा समावेश असून शिंदे गटाला फक्त एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. 

बारणे म्हणाले, मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली याचा आनंद आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षातील 16 खासदार निवडून आले तर नितीश कुमार पक्षातील 12 खासदार निवडून आले असून शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले तर चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आले त्यांना मंत्रिपद देण्यात आले मात्र शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आले. शिंदेसेनेकडून खासदार प्रताप राव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या वरून श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Edited by - Priya Dixit