1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (15:58 IST)

मोफत लसीकरणाबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता

The possibility
राज्यातील मोफत लसीकरणाबाबत उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी महत्त्वाची माहिती दिली. छत्रपति शिवाज महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांनी विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाबाबत उद्या निर्णयाची शक्यता असल्याचं देखील सांगितलं. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाईल. राज्याच्या जनतेचा हिताचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं अजित पवार म्हणाले.
 
लसीची कमतरता केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशात आहे. याशिवाय, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. या सगळ्याचे अधिकारी केंद्र सरकारला आहेत. आम्ही रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की पूर्वी आम्हाला रेमडेसिवीर राज्य सरकारला थेट देता येत होती, आता केंद्र ठरवतं, असं सांगितलं. सध्या देशात उत्पादन होत असलेल्या रेमडेसिवीर अपुऱ्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.