मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (09:44 IST)

राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत राज्यात मान्सून आणखी सक्रिय होणार असून पुढील चार-पाच दिवसांत राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकणसह मुंबई आणि परिसरात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. येत्या चार-पाच दिवसांत राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातही मान्सून चांगला सक्रिय होणार असून कोकण आणि गोव्यात येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात पहिल्यापासूनच चांगला पाऊस सुरु आहे. त्यानंतर आता पुढील चार पाच दिवसांत या भागात सर्वदूर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पुढील दोन-तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.