सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (20:52 IST)

आमदार सरोज आहिरे यांची भूमिका अस्पष्ट

The role of MLA Saroj Ahire is unclear
Saroj Ahire राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी माझी सही घेतली गेली. मीदेखील  नेत्यावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता सही केली. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना  कळविले नाही.  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे अन् पाठिंब्यासाठी माझी सही घेत असल्याची बाब समजल्यानंतर मला मानसिक धक्का बसला, अशी प्रतिक्रिया देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांचा पाठिंबा नेमका कोणत्या गटाला याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
 
राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा नेमका कोणत्या गटाला याबाबतचा फैसला बुधवार बैठकीत होणार होता. मात्र, आमदार सरोज अहिरे या आजारी असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. अशात आमदार अहिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतील फुटीवर आपले मत मांडले, मात्र अद्याप पाठींबा जाहीर केलेला नाही.