मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (15:55 IST)

शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही

The Shiv Sena will be given an agreement but will never give a date
शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही, अशी धमकीवजा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर कारवाई करताना षडयंत्र रचलं गेलं. कारवाईदरम्यान कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. शिवसेनेला या सगळ्या प्रकरणात करारा जवाब दिला जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
 
नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यांच्याविरोधात म्हणजेच एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग केला गेला. या सगळ्यात कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. प्रसंगी त्यांना जेवणाच्या ताटावरुन उठवून गेलं, आम्ही या सगळ्याला करारा जवाब देऊ, असा आक्रमक पवित्रा नितेश राणेंनी घेतला.
 
“मातोश्रीला कोण जास्त खुश करत याची स्पर्धा लागलेली आहे.आमदारांना मंत्री बनायचं आहे. मंत्र्यांना आपलं पद शाबूत ठेवायचं आहे.. त्यांनी राणेंवर टीका करायची. जशी ऑलम्पिकची स्पर्धा लागली आहे. आमच्यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होत असेल… त्यांना पद भेटत असतील तर आमचा त्यांना आशीर्वाद आहे”, असा टोला त्यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.