1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (07:43 IST)

टेम्पो चालकाचा मुलगा आला राज्यात पहिला, गिरीश परेकर हा मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात पहिला

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फ घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर रुपाली माने मुलींमध्ये पहिली आली आहे. गिरीश परेकर हा मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.
 
MPSCकडून 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल हा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात एकूण 200 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
 
प्रमोद हे मूळचे मिरज तालुक्यातील सोनी येथील रहिवाशी आहेत. प्रमोदचे वडील टेम्पो चालक आहे तर आई टेलरिंगचं काम करते. त्याचे प्राथमिक शिक्षण हे सोनी गावातच झालं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात केली. पत्नीला आणि मुलीला सोडून प्रमोद पुण्यात MPSC च्या तयारीसाठी राहत होते. गेल्यावेळी सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र या कठीण परिस्थितीमधूनही मार्ग काढत प्रमोद यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली.
 
प्रमोद म्हणतो, "मी अनेक वर्षांपासून MPSC आणि UPSC ची तयारी करत आहे. मात्र गेल्यावेळी मला MPSC मध्ये रँक घेता आला नव्हता. मात्र यंदा मी ते करून दाखवलं" असं प्रमोद सांगतात.