संबंधित माहिती
- हळदीच्या कार्यक्रमात राडा ११ जणांवर गुन्हे तर चार अटक
- खोटे बोलणे ही तर भाजपची खासियत! प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची सरकारवर टीका
- 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं असे नाही तर मैं सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं अशी घेतली यांनी शपथ
- राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?
- अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा 'आयटी'वर परिणाम
कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ओझे कादवा नदीवर रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या अनिता यादव वाघमारे (२९) तसेच त्यांचा मुलगा ओंकार यादव वाघमारे (१४) यांचा बुडून मृत्यू झाला. प्राजक्ता बाळू गांगोडे (वय १५) हिचाही बुडून मृत्यू झाला.
या घटनेत अधिक माहिती अशी की, ओझे कादवा नदीवर अनिता वाघमारे या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा ओंकार वाघमारे तसेच प्राजक्ता हे दोघेही गेले होते. यावेळी हे तिघेही नदीत बुडाले. अनिता यादव वाघमारे या उमराळे खुर्द येथील अंगणवाडीच्या मदतनीस आहेत.
पुढील लेख
